रामपूर :- येथील अजीमनगर पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील हे प्रकरण आहे. हा तरुण बाजूच्या गावातील मुलीवर प्रेम करत होता. दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. दोघांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाकाही घेतल्या.
तिचाही त्याच्यावर भरोसा बसला होता. त्यामुळे तिने त्याला रात्री 12 वाजात घरी बोलावलं. तोही तिच्या सांगण्यावरून तिच्या गावी गेला. संधी साधून तरुणीने त्याला आपल्या घरात बोलावलं. तोही घरात घुसला अन् घात झाला. कुणी तरी घरात आल्याची चाहूल कुटुंबीयांना लागली. त्यामुळे अख्खं घर जागं झालं.
शेजाऱ्यांनीही बदडलं…
घरातल्या लोकांनी घरातील कोपरा न् कोपरा शोधला. त्यावेळी आपल्या लेकीच्या घरातच हा तरुण सापडला. या घरातील लोक आधी चोर चोर म्हणून ओरडले. त्यामुळे आजूबाजूचे लोकही घरात आले. त्यानंतर या सर्वांनी मिळून त्याचे सर्व कपडे काढून घेतले. त्याला घराबाहेरच्या झाडाला बांधून चांगलीच धुलाई केली. सर्वच जण एक एक करून त्याला मारहाण करत होते. त्याला प्रचंड मारहाण केल्याने हा तरुण रक्तबंबाळ झाला. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
लग्न लावून देण्याचं ठरलं…
या तरुणाचे कारनामे त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. त्यानंतर त्याचे कुटुंबीय सकाळी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण गावच्या पंचायतीत गेलं. पंचायतीने दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्या. त्या मुलीचं आणि मुलाचं म्हणणं ऐकून घेतलं. दोघांनीही आम्हाला लग्न करायचं असल्याचं पंचायतीला बिनधास्तपणे सांगून टाकलं. त्यानंतर दोन दिवसांनी या दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ज्या घरात मार खाल्ला आता त्या घरातच लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दोघेही दोन दिवसात बोहल्यावर चढणार आहेत.
व्हिडीओ व्हायरल.
दरम्यान, या तरुणाला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत तरुणाला बेदम मारहाण केली जात आहे. तर हा तरुण वाचवण्यासाठी गयावया करताना दिसत आहे. त्याच्या अंगातून घामाच्या आणि रक्ताच्या धारा वाहताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेची काहीच खबर मिळाली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.