Viral Video:- आजकाल लहानांपासून वयस्कर लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारची समस्या सामान्यतः वयस्कर लोकांमध्ये आढळून यायची, परंतु आता प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहे. अनेकांना कधी जिममध्ये व्यायाम करताना तर कधी डान्स करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण सोशल मीडियावर पाहत असतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये लग्न समारंभात नाचताना एका इंजिनीअरचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला आहे.मृत इंजिनीअरचे नाव दिलीप राऊतकर असे आहे. ते आपल्या भाचीच्या लग्नात डान्स करत असताना मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिलीप राऊतकर हे लग्न समारंभात स्टेजवर वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह नाचताना दिसत आहेत.
नाचत असताना दिलीप स्टेजवर बसतात आणि काही क्षणात खाली कासळतात.दरम्यान, स्टेजवर काय झाले हे लोकांना समजण्यापूर्वीच दिलीप यांचा मृत्यू होतो. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास दिलीप आणि त्याचे नातेवाईक स्टेजवर वधू-वरासोबत नाचत होते. नाचत असताना दिलीप यांच्या छातीत अचानक दुखू लागले यावेळी ते स्टेजवर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, व्हिडीओमध्ये दिलीप हे गाण्याच्या तालावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. मात्र, मध्येच त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे ते खाली बसत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय काही वेळाने ते खाली पडल्याचं दिसताच उपस्थित लोक तिथे वाजणारे गाणे बंद करतात आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत दिलीप यांचा मृत्यू होतो. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये शूट झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.