How Sesame Seeds Affect Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यापासून यकृत निरोगी ठेवण्यापर्यंत, गुणकारी तिळाचे पाहा फायदे..
मानवी शरीरात कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पण बॅड कोलेस्टेरॉलमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक यासारखे आजार वाढतात.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करा. त्यात 15 टक्के सॅच्युरेटेड फॅट, 41 टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि 39 टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. यासंदर्भात, लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आहारतज्ज्ञ काजल तिवारी यांनी पांढऱ्या तिळाचे फायदे सांगितले आहे
तिळाचे फायदे :

कोलेस्टेरॉल नियंत्रित करते
तीळ हेल्दी फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. यासह चयापचय सुधारते. या बियांमध्ये मेथिओनाइन देखील असते, जे यकृत निरोगी ठेवण्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात ठेवते.
एका संशोधनानुसार, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉल खूप कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दोन महिने रोज 40 ग्रॅम तीळ खाल्ल्यास बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.
यकृत निरोगी ठेवते

तिळामध्ये मेथिओनाइन असते, जे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. तिळाच्या बियांमध्ये आढळणारा आणखी एक घटक म्हणजे ट्रिप्टोफॅन. जे शरीराला शांत झोप देण्यास प्रोत्साहित करते.
हाडे मजबूत होतील.

आहारतज्ञांच्या मते, तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. तिळामध्ये प्रथिने आणि अमीनो ऍसिड असते. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
त्वचेसाठी फायदेशीर

तीळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला आवश्यक पोषण देते. तीळ नैसर्गिकरित्या स्काल्पखाली तेल तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात. यासह त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.