दीड तास सिनेस्टाईल पाठलाग करून दोन दरोडेखोरांना घेतले ताब्यात, तीन संशयित फरार.

Spread the love

पारोळा ,एरंडोल, कासोदा, भडगाव, पोलीस पथकाची कारवाई
एरंडोल :-
पारोळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजीव जाधव हे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रात्रीची गस्त घालत असताना. पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ भरधाव वेगाने जात असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनात आले. पोलीस पथकाने सदर वाहनास थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहनाचा वेग वाढवून पळ काढल्यामुळे पारोळा येथील पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. एरंडोल, कासोदा, भडगाव व पारोळा येथील पोलीस पथकाने सुमारे दीड तास वाहनाचा पाठलाग केला अखेर भडगाव येथे सदर वाहनाने शासकीय वाहनास धडक दिल्यानंतर पोलिसांनी स्कार्पिओ क्रमांक एम एच 18 डब्ल्यू 0670 सह दोन जणांना ताब्यात घेतले तर त्यांचे अन्य तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

याबाबत माहिती अशी की पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे त्यांचे सहकारी हवालदार कोळी ,राठोड, मिस्तरी, यांचे सह रात्रीची गस्त घालत होते. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले पोलीस पथकाने थांबण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने नेले त्यामुळे पोलिसांच्या संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव यांनी एरंडोल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद बागल यांच्याशी संपर्क साधून एरंडोल येथे नाकाबंदी करण्याचे सांगितले उपनिरीक्षक शरद बागल यांनी हवालदार संतोष चौधरी, किरण पाटील यांचे सह धरणगाव चौफुली येथे बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केली.

तसेच शहरात गस्त घालत असलेले हवालदार संदीप पाटील व सपकाळे यांना घटनेची माहिती देऊन तात्काळ कासोदा रस्त्यावर जाण्याचे सांगितले. एरंडोल व पारोळा येथील पोलीस पथक सदर वाहनाच्या सिनेस्टाईल पाठलाग करीत असताना संशयित वाहनाच्या चालकाने राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या दत्त मंदिराजवळील रस्त्याने वाहन वळवून कासोदा कडे पलायन केले. संशयित वाहन कासोद्याकडे गेल्यामुळे उपनिरीक्षक शरद बागल यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच कासोदा स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्याशी संपर्क साधून नाकाबंदी करण्यास सांगितले. संशयित स्कार्पिओ चालकाने कासोदा येथील लावण्यात आलेले बॅरिगेट्स उडवून आडगाव मार्गे भडगाव कडे पलायन केल्यामुळे उपनिरीक्षक शरद बागल यांनी भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी भडगाव येथे नाकाबंदी केली पोलिसांनी भडगाव येथे सदरचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र स्कार्पियो चालकाने भडगाव पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनास धडक दिली. सुदैवाने कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. पोलिसांनी स्कार्पिओसह दोन संशयित.१) मुकेश विठ्ठल पाटील वय २४ रा पाळधी ता धरणगाव . २) रोशन मधुकर सोनवणे वय ३३ , अंबिका नगर वडजाई रोड धुळे यांना ताब्यात घेतले असून त्यांचे इतर तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी दोन्ही संशितांची चौकशी केली असता ते गुरे चोरणारे टोळी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून संशयतांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पारोळ्याचे उपनिरीक्षक राजू जाधव, एरंडोलचे उपनिरीक्षक शरद बागल कासोद्याचे उपनिरीक्षक अमोल गुंजाळ व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुमारे दीड तास सिनेस्टाईल पाठलाग करून दोन संशयतांना ताब्यात घेतले
दोघांना अटक अन्य तीन फरार…..
संशयित आरोपी १) मुकेश विठ्ठल पाटील वय २४ रा पाळधी ता धरणगाव . २) रोशन मधुकर सोनवणे वय ३३ , अंबिका नगर वडजाई रोड धुळे असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित आरोपींनी बाकी सहकार्याची नावे ही सांगितले . यात ३) फैय्याज शेख रा. पाळधी . ४) शशिकांत सदाशिव मोरे , रा मोहाडी जि धुळे ५) पाचवा आरोपी अनोळखी असून नाव माहीत नसल्याचे संशियतानी सागितले.

टीम झुंजार