राष्ट्रीय महामार्गा वरील डांबर डिझेल सदृश्य प्लॅनवर पोलिसांची धाड 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,सहा आरोपींना घेतले ताब्यात.

Spread the love


प्रतिनिधी l एरंडोल
राष्ट्रीय महामार्ग सहा वरील म्हसवे शिवारातील म्हसवे फाट्याजवळ राजू का ढाबा या हॉटेलच्या पाठीमागे डांबर व डिझेल सदृश्य तेल विक्रीचा बेकायदेशीर व बोगस प्लॅन सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानरीक्षक नासिक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना गस्तीवर असताना मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी पारोळा पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी रात्री दीड वाजेच्या सुमारास धाड टाकली. धाडीत जवळपास 45 लाख रुपये किमतीचा विविध मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल आहे.

परिणामी महामार्गावरील सरास सुरू असलेल्या अवैध धंदे चालकांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
शहरापासून पाच किमी अंतरावरील म्हसवे फाट्याजवळच हा अवैद्य व बेकायदेशीर धंदा राजरोसपणे सुरू होता. याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली धाडीत डांबरचे दोन डंपर, इतर वाहने तसेच डांबर, डिझेल सदृश्य द्रव पदार्थ व विविध साहित्य असे मोठ्या प्रमाणात मिळून आले आहे.

त्यासोबत हा बेकायदेशीर प्लॅन चालवणारे संशयित संजय भाऊसाहेब जाधव वय 23, भाईदास नाना मालिश वय 23 युवराज हिंमत पाटील तिघी राहणार मोगन तालुका जिल्हा धुळे, भीमराव शंकर पाटील वय 42 रा. म्हसवे तालुका पारोळा. राजकुमार दास हिरादास वय 26, अमलेश प्रेम कुशवाह वय 24 विनोद कुमारसिंह राजदेव सिंह वय 52 तिघी राहणार उत्तर प्रदेश, अली पूर्ण नाव माहित नाही असे आठ जण रंगेहात मिळून आले आहेत. पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी हवालदार रवींद्र पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या आठही विरुद्ध भादवि कलम 407, 411, 285, 34 तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी देखील भेट दिली आहे. या पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत. दरम्यान महामार्गावर तीन महिन्यात बोगस दारू विक्री प्रकरण नंतर ही दुसरी सर्वाधिक मोठी नाशिक पथकाची कारवाई आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार