विवाहित तरुणी ही आंघोळ करत असताना चिंचखेडा येथे राहणाऱ्या शेतमालकाने लपून मोबाईलद्वारे तिचे फोटो काढले आणि त्याआधारे ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केले.
धुळे : आंघोळ करताना मोबाईलमध्ये विवाहितेचे फोटो काढून ते सासरी दाखवण्यासह तुझी गावभर बदनामी करेन, अशी धमकी देत शेतमालकाकडून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना चिंचखेडा गावाजवळील सन्नाई शिवारात घडली आहे.
बलात्कारामुळे विवाहिता गरोदर राहिली. त्यानंतर विवाहितेसह तिच्या आई-वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय विवाहितेने धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,
चिंचखेडा गावात राहणाऱ्या शेतमालकाने ऑगस्ट २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दिवसा १० ते ३ वाजेच्या दरम्यान, आई-वडील राहत असलेल्या ठिकाणी विवाहिता ही आंघोळ करीत असताना चिंचखेडा येथे राहणाऱ्या शेतमालकाने लपून मोबाईलद्वारे तिचे फोटो काढले. हे फोटो विवाहितेला दाखवून तिच्या सासरकडील मंडळींनाही फोटो दाखविण्याची भीती घालत तिच्या असाह्यतेचा फायदा घेतला आणि तिला शेतात बोलावून वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.
शेतमालकाने वेळोवेळी केलेल्या बलत्कारामुळे पीडित महिला ही गरोदर राहिली. याबाबत तिने आई-वडिलांना सांगितले असता त्यांनी चिंचखेडा येथे राहणाऱ्या या शेतमालकाला जाब विचारला.
त्यानंतर त्याने विवाहितेच्या वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच ही बाब कोणास सांगितली, तर मोबाईलमधील फोटो विवाहितेच्या सासरच्या लोकांना दाखवून तुमची गावभर बदनामी करेल अशी धमकी दिली. त्यानुसार काल धुळे तालुका पोलीस ठाण्यात शेत मालकाविरोधात भादंवी कलम ३७६ (क), (न), ५०४, ५०६ यासह अॅट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.