वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल , दोन तासात अटक ,पांच दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी
प्रतिनिधी | अमळनेर
अमळेनर तालुक्यात काल रात्री एक टाटा मॅजिक गाडीने अँपेरिक्षाला धडक मारताच अपे पलटीझाली त्यात भीषण अपघाता झाला आहे.खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी यात्रेसाठी गेलेल्या मेहरगाव येथील एका २० वर्षीय तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर दोन जणी जखमी झाल्यात ,त्यांच्यावर उपचार सुरू आहेत , बेदरकार वाहनचालविणाऱ्याविरुद्ध मृतयुवतीच्या मेव्हण्याने फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करताच मारवड पोलिसांनी दोन तासात वाहनचालकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पांच दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे,मृत युवतीच्या मृत्यूने मेहरगावात शोककळा पसरली आहे
मेहरगाव येथील रहिवासी युवती खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी अमळनेर येथील यात्रोत्सव पाहण्यासाठी आली असता यात्रेसाठी काल दिनांक १४ रोजी रात्री ८:३० वाजता खेडीखुर्द येथून रिक्षातून जात असताना अमळगावच्या पुढे मेहरगाव फाट्यावर दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील २१ वर्षीय अश्विनी गुलाब भामरे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून खेडीखुर्द येथील रेखाबाई प्रवीण पाटील वय ५३ व जळगावच्या वर्षा हर्षल बोरसे वय २८ या दोन जणी जखमी झाल्याची घटना १४ मे रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मेहेरगाव फाट्याजवळ घडली. अश्विनी गुलाब भामरे असं मयत तरुणीचं नाव आहे. १६ एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्न ठरले होते. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. तत्पूर्वीच अश्विनीवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी मृत अश्विनीचे मेव्हणे निलेश प्रवीण पाटील राहणार खेडीखुर्द यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात टाटा मॅजिक चालक योगेश रोहिदास पाटील वय २६ राहणार अमळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यास पोलिसांनी दोन तासात अटक करून न्यायालयात हजर केले असता पांच दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली
पाडळसरे येथून जवळच असलेल्या मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १४ एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेव्हण्यांकडे आली होती. रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच १९ बीजे ८९९६ या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरुन रिक्षासोबत मार्गस्थ झाले.
अमळगाव पुढील मेहेरगाव फाट्याजवळ एमएच १९ बीजे १४०५ या क्रमाकांच्या टाटा मॅजीक या भरधाव वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यात अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर रिक्षातील रेखाबाई पाटील आणि वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले होते. रिक्षाच्या मागे येत असलेल्या मेव्हण्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात अश्विनी हिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डोळयासमोर लहान बहिणीचा मृत्यू बघून मोठ्या बहिणीने हंबरडा फोडला. अपघातील जखमी रेखाबाई पाटील आणि वर्षा बोरसे या दोघींवर अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लग्नापूर्वीच तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
मयत अश्विनी हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तिच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. अश्विनी हिच्या लग्नाबाबत बोलणी सुरु होती, १६ एप्रिल रोजी लग्न पक्के झाले होते. लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रुपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली आणि लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्न जमलेल्या तरुणीचा लग्नापूर्वीच मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात प्रकरणी रविवारी दुपारी मयत अश्विनी हिचे मेव्हणे निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमएच १९ बीजे १४०५ या क्रमाकांच्या वाहनावरील योगेश रोहिदास पाटील राहणार अमळगाव या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अंमलदार संजय पाटील यांनी दोन तासात वाहनचालक योगेशला ताब्यात घेऊन अटक केली व दुपारी २ वाजता अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!