धक्कादायक! आई-बाबा मला माफ करा.मी चांगली मुलगी होऊ शकले नाही,मि खरं प्रेम केले अशी सुसाईट नोट लिहून केली आत्महत्या.

Spread the love

लग्नाला घरच्या लोकांचा विरोध होता आधी केली प्रियकराने नंतर मग प्रेयसीने संपविले जीवन
कानपूर (उत्तर प्रदेश) :- हॉटेलच्या खोलीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच खोलीत तिनं लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली. त्यात तिनं आई वडिलांची माफी मागितली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्लागंजमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणानं आत्महत्या केली होती. त्या तरुणाच्या प्रेयसीनं रविवारी एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पोलिसांना हॉटेलच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे.

त्यासोबतच देशी दारुची बाटली आणि ब्लेड आढळून आलं आहे.आई-बाबा मला माफ करा. मी चांगली मुलगी होऊ शकले नाही. मी विशालवर खरं प्रेम केलं होतं, लग्नही केलं आणि आता त्याच्याकडेच जातेय, असं मानसीनं तिच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. अंबिकापुरमध्ये राहणारी मानसी (२७) उन्नावमधील एका बँकेच्या कर्ज विभागात कार्यरत होती. रविवारी तिचा मृतदेह गुप्ता मार्केटमधील एका हॉटेलातील खोलीत पंख्याला लावलेल्या स्थितीत सापडला.

हॉटेलचे व्यवस्थापक करुणा शंकर शुक्ला यांनी पोलिसांना बोलावलं. खोलीचं दार बंद आतून बंद होतं. त्यामुळे पोलिसांनी खोलीचं दार तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.हॉटेलमध्ये देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारे तरुणीच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. ‘दीड वर्षांपूर्वी नीट परिक्षेच्या दरम्यान मानसीची ओळख विशाल दुबेशी झाली होती. पुढे दोघांची ओळख वाढत गेली. आम्ही लग्नासाठी तयार होतो. मात्र विशालचे कुटुंबीय लग्नाच्या विरोधात होते. त्यामुळे विशालनं १२ मे रोजी घरात गळफास घेतला. विशालला शेवटचं पाहण्यासाठी जात असल्याचं सांगून मानसी घरातून निघाली होती.

मात्र त्यानंतर आम्हाला तिच्याच निधनाबद्दल समजलं,’ अशी माहिती मानसीचे वडील रमेश चंद्र यांनी सांगितलं.मानसीच्या डाव्या हाताच्या मनगटावर जखम आढळून आली आहे. आत्महत्येसाठी तिनं ब्लेडनं नस कापण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. मानसी सकाळी १० वाजता हॉटेलमध्ये आली होती. कोणीतही गेस्ट येणार असल्याचं तिनं सांगितलं होतं. पाचशे रुपये भरुन तिनं खोली बूक केली होती, अशी माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकानं दिली. मानसीच्या कुटुंबाकडून कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

हे पण वाचा

टीम झुंजार