सकाळी व्हिडीओ कॉलवर बोलणं झालं आणि दोन वाजता निधनाचे वृत धडकले,लोणखुर्द गावात चुलही पेटली नाही
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर :- तालुक्यातील लोणखुर्द येथील रहिवासी व भारतीय सीमा सुरक्षा बलाच्या सेवेत अरुणाचल प्रदेशातील भूतान सीमेवर सेवारत असलेल्या जवानांचा बदलीच्या ठिकाणी जात असताना वाहनाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १६ रोजी दुपारी घडली , लीलाधर नाना पाटील वय ४२ असे मृत सैनिकाचे नाव असून त्यांच्यावर लोणखुर्द येथे दिनांक १८ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या जवानांना खाद्यपदार्थ पोहचविण्यासाठी जात असलेल्या आर्मीच्या गाडीचा अपघात झाला त्यात मागचे फाटक तुटल्याने तालुक्यातील लोणखुर्द येथील भारतीय सुरक्षा बलात हवालदार पदी असलेल्या सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. लोण येथील लीलाधर नाना पाटील वय ४२
हे शेतकरी कुटुंबातील युवकाला देशप्रेम व देशसेवा करण्याची आवड शालेय जीवनापासून होती त्याचा शेतीतून व्यायाम व अभ्यास करून २००१ साली भरती झाली , त्यांचा सेवकाळ वाढवून मागितला होता
म्हणून आता आसाम मधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते.गेल्या २ जानेवारी रोजी ते सुटीवरून सेवेसाठी पुन्हा कार्यरत झाले होते , त्यांचा कार्यकाळ संपल्यानन्तर त्यांनी दोन वर्षे वाढवून घेतले होते. आसामहून ४०० किमीवर अरुणाचल प्रदेशात भूतान सीमेवर त्यांची बदली झाल्याने आर्मीच्या ट्रक मध्ये २० जणांची तुकडी व खाद्यपदार्थ नेली जात होती. लीलाधर हे मागे बसलेले होते. पहाडी रस्त्यात अचानक ट्रकचा अपघात झाल्याने मागचे फाटक तुटल्याने लीलाधर शिंदे खाली पडून दगडाचा मार लागल्याने जागीच ठार झाले. त्यांचे शव १८ रोजी सकाळी लोणखुर्द येथे आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील , पत्नी सोनाली वय ३९, ,मुलगा सुयश (वय १५ इयत्ता ९वी) ,मुलगी मीनाक्षी (वय १२ इयत्ता ६वी ) ,मोठा भाऊ रवींद्र व लहान भाऊ शैलेंश असा परिवार आहे. ते वायरमन प्रवीण पाटील यांचे मेव्हणे होत.
सकाळी व्हिडीओ कॉलवर बोलणं झालं आणि दोन वाजता निधनाचे वृत धडकले
आज सकाळी ९;३० वाजता मृत लीलाधर शिंदे यांनी पत्नी सोनाली हिस व्हिडीओ कॉल करून बोलणं झालं त्यात मुलांना अमळनेरच्या ग्लोबल शाळेत शिक्षण व क्लासेस साठी बोलणं झालं , मुलांना बोलणं झालं पप्पा कधी येणार म्हणून मुलगी मोनाक्षीने लीलाधर शिंदे यांना विचारले असता बेटा आता ३ मे ला सुटी मिळणार होती पण उन्हात असल्याने व पुढे मावशीच्या मुलीचे लग्न होऊन म्हणून पावसाळा सुरू झाल्यावर येईल म्हणून आश्वासन दिले , टाटा बाय बाय मेले आणि मी आता डीवटीवरून आल्यावर रात्री बोलेन म्हणून सांगितले
मुलांची काळजी घे म्हणून सोनालीला सांगून फोन ठेवला व दुपारी जवान लीलाधर शिंदे यांचा अपघातात निधन झाल्याचे वृत्त धडकताच कटुंबिय व परिवार सुन्न झाला , लहानशा गावात सायंकाळ पर्यत जवान लीलाधर शिंदे अमर रहेचे फलक लागले आणि सुन्न गावात स्मशान शांतता पसरली ,गावात चुलही पेटली नाही , मृत लीलाधर शिंदे यांच्यावर दिनांक १८ रोजी अंत्यसंस्कार होणार असून त्याच दिवशी ग्रामपंचायतिची सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदान होणार आहे मात्र मतदान प्रक्रिया थांबवावी म्हणून ग्रामस्थ महसूल विभागाकडे आग्रही भूमिका घेत आहेत त्यावर काय निर्णय घेतला जातो ते अद्याप स्पष्ट झाले नाही.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!