पाथर्डी : उन्हाळ्यामुळे थंड हवेत आपणही घराच्या बाहेर झोपत असाल तर सावधान. हा मोह आपल्या जीवावर बेतू शकतो. कारण काही दिवसांपूर्वी एका शेतातील घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे.शेतामध्ये बाहेर झोपलेल्या दाम्पत्यावर या दरोडेखोरांनी काठ्या आणि तलवारीने हल्ला केला असून ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
दरोडेखोर आल्यानंतर पहिल्यांदा खाली झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर महिला उठते आणि ओरडू लागते. त्यानंतर महिलेचा पतीही उठतो. पण चार दरोडेखोर त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना शांत बसायला सांगतात.
महिला जास्त ओरडत असल्यामुळे एका दरोडेखोराने महिलेच्या तोंडावर लाथ मारल्याचं दिसत आहे. त्यानंतर चारही सशस्त्र दरोडेखोर काही वेळानंतर निघून गेल्याचं सांगण्यात येतंय पण या चोरीचा थरार पाहून अंगावर काटा येईल.दरम्यान, आपणही थंड हवेसाठी घराच्या बाहेर झोपत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू नसतील याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातील रहिवाशी असाल तर कुत्रे पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा धोका कमी होऊ शकतो.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






