उन्हाळ्यात लघवी करताना जळजळ होते? तांदळाच्या पाण्याचा १ उपयोग, आग होईल कमी

Spread the love

Know all about ‘tandulodaka’, the Ayurvedic remedy for UTI, white discharge, burning sensation when urinating उन्हाळ्यात लघवीला आग होण्याचा त्रास अनेकांना होतो, घरगुती उपाय उपयोगी पडतात पण जास्त त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

लघुशंका करताना अनेकदा जळजळ, ब्लीडींग किंवा वेदना होतात. हा त्रास अनेक कारणांमुळे होतो. हा त्रास अल्पावधीसाठी असतो, मात्र यातून होणारी वेदना भयंकर अपायकारक ठरते. या जळजळीमुळे अनेकदा ओटीपोटात देखील दुखते. उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते. कारण शरीरात उष्णता वाढल्याने लघवी व रक्ताच्या संबंधित समस्या वाढू लागतात. या समस्येवर उपाय म्हणून तांदळाच्या पाण्याचा वापर आपण करू शकता.

यासंदर्भात, आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर वरलक्ष्मी सांगतात, तांदळाच्या पाण्याला आयुर्वेदात तंदुलोदक म्हणतात. यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. शरीर थंड ठेवण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे. हा आयुर्वेदिक उपाय ब्लीडिंग डिसऑर्डर व यूरिनरी ट्रॅक्ट डिसऑर्डरवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.

सर्वप्रथम या गोष्टी लक्षात ठेवा

Pic for Google

या उपायासाठी नेहमी चांगल्या प्रतीचा लाल किंवा पांढरा तांदूळ वापरा.

तांदळाचे पाणी बनवण्यापूर्वी ते पाण्याने चांगले धुवा, म्हणजे सर्व अशुद्धी निघून जातील.

१ वर्ष जुना तांदूळ अधिक फायदेशीर ठरेल.

आयुर्वेदात लाल तांदळात अधिक पौष्टिक गुणधर्म असल्याचे मानले जाते.

तांदळाचे पाणी बनवण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करा.

घरी तांदळाचे पाणी कसे बनवायचे

Pic for Google

250 ग्रॅम लाल तांदूळ घ्या आणि ते चांगले धुवा.

भांड्यात तांदूळ ठेवा आणि त्यात 6 पट पाणी घाला.

आता तांदूळ काही मिनिटे स्वच्छ हाताने नीट ढवळून घ्या.

नंतर भांड्यावर एक झाकण ठेवा, व ६ तासानंतर त्यातील पाणी वगळून काढा.

जळजळीची समस्या जाणवल्यास या पाण्याचे सेवन करा.

तांदळाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे

https://www.instagram.com/reel/CrsQW3jIoob/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

तांदळाच्या पाण्यात कर्बोदके असतात, जे त्वरित ऊर्जा देतात. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. जे पचनशक्ती मजबूत करतात. म्हणूनच हे पाणी प्यायल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब या आजारांपासून आराम मिळतो. व लघवीच्या त्रासापासून देखील आराम मिळतो.

त्वचा व केसांसाठी फायदेशीर

Pic for Google

तांदळाच्या पाण्याने त्वचा निरोगी व तजेलदार दिसते. या पाण्यात इनोसिटॉल मुबलक प्रमाणात असते, केसांवर तांदळाचे पाणी लावल्याने केस वाढण्यास मदत होते. यासह कोंड्यापासून देखील सुटका होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार