धुळे :- मध्यप्रदेशातून धुळे शहराकडे गुटख्याची तस्करी करणारे दोन ट्रक सांगवी पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. यावेळी ट्रकसह सुमारे ८३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच दोन्ही ट्रक चालकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे मध्य प्रदेशातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मध्यप्रदेशातून धुळे शहराकडे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पथकाच्या माध्यमातून गस्त आणि टेहळणी सुरू केली. यावेळी दहिवद गावाजवळ हॉटेल छत्रपती नजीक पोलीस पथकाने एक संशयित ट्रक थांबवला. या ट्रकची (क्र. के ए 01 ए जे 0015) झडती घेतली असता यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. महाराष्ट्रात प्रतिंबधीत असणारी सुगंधीत तंबाखू इंदूरकडून धुळ्याकडे नेली जात असल्याची बाब यावेळी स्पष्ट झाली आहे. यावेळीट्रकचालक किशोर राव एन नागेद्रराव (वय 31 रा. रेल्वे कम्पाऊन्ड मपाडी रोड बँगलोर नॉर्थ, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच या ट्रकमधून 33 लाख 60 हजार रुपये किंमतीची तंबाखुचे एकूण 280 बॉक्स व 15 हजार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यापाठोपाठ दुसर्या एका ट्रकला (क्र.के ए 01 ए जे 2776) हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करुन पकडण्यात आले. या ट्रकवरील चालक देखील समाधानकारक उत्तर देत नसल्याने संबंधीत वाहन पोलीस ठाणे आवारात आणण्यात आले. दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यात तंबाखूचा माल आढळून आला. यावेळी ट्रकचालक मंजू रोक्कडदम चन्नाप्पा (वय 33 रा. चन्नाप्पा एन ए प्लॉट मदान भावी धारवाड, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच या ट्रकमधून 12 लाखाची तंबाखूचे एकूण 100 बॉक्स व 7 लाख 64 हजार 400 रुपये किंमतीची प्रभात कंपनीच्या तंबाखूचे 65 बॉक्स व 15 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही ट्रकमधून ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त
कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही ट्रकमधून एकूण 83 लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांना लेखी पत्र देवून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी अंसाराम आगरकर यांच्या मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई संदीप पाटील, पोसई कृष्णा पाटील, पोहेकॉ संजय सुर्यवंशी पोना संदीप ठाकरे, पोकॉ रोहीदास संतोष पावरा, मनोज पाटील, संतोष पाटील, इसरार जकाउल्ला फारुकी, कृष्णा पावरा, मुकेश पावरा, योगेश मोरे यांच्या पथकाने केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.