पतीचे झाले हृदयविकाराने निधन, घरात अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल

Spread the love


गांधीनगर :- गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरेली जिल्ह्यातील लिलीया गावातील धवल राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.त्यामुळे घरावर शोककळा पसरली होती. घरामध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. आजूबाजूचे लोकही धवल यांच्या घरी पोहोचू लागले.

मात्र त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. धवल यांची पत्नी प्रिन्सी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील आणखी एका मृत्यूनं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. पतीचा हृदयविकारानं दुर्देवी मृत्यू झाला; पण पती गेल्याचा विरह पत्नीला सहन झाला नाही, व तिनं टोकाचं पाऊल उचलत पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमकं काय घडलं? धवल यांच्या अकाली मृत्युमुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. कुटुंब, नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले होते. धवल यांच्या पत्नीचं काहीजणांनी सांत्वनसुद्धा केलं.

मात्र घरामध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच धवल यांच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेनं उचललेल्या या पावलामुळे कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात खळबळ उडाली. शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले.

संबंधित कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

हे देखील वाचा

टीम झुंजार