जळगाव :- पायी चालतांना मोबाईलवर बोलणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीने पलायन करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील मोहाडी परिसरातील उमेश पार्क येथून गुरूवारी १८ मे रोजी दुपारी अटक केली आहे.
त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहे. राहुल देखनाळे रा.उमेश पार्क, मोहाडी परिसर, जळगाव असे अटक केलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.
संशयित आरोपी राहुल देखनाळे याच्याकडे चोरीचे मोबाईल असुन ते मोबाईल तो विकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पोलीस अंमलदार विजयसिंग धनसिंग पाटील, सुधाकर रामदास अंभोरे, जितेंद्र राजाराम पाटील, अकरम याकुब शेख, महेश आत्माराम महाजन, नितीन प्रकाश बाविस्कर, प्रीतम पिंतांबर पाटील, विजय शामराव पाटील, संदीप श्रावण सावळे,
ईश्वर पंडीत पाटील, उमेशगिरी गोसावी आदींना तपासकामासह कारवाईकामी गुरूवारी १८ मे रोजी दुपारी रवाना केले.गुप्त बातमीदाराकडून माग काढत तपास पथकाने संशयीत राहुल देखनाळे यास मोहाडी परिसरातील उमेश पार्क परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंगझडती दरम्यान ओपो कंपनीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यातआले. आपल्या साथीदाराच्या मदतीने धुम स्टाईल मोटार सायकलने दोन्ही मोबाईल जळगाव शहरातून पाच ते सात महिन्यापुर्वी पायी चालणा-या नागरिकांच्या हातातून हिसकावले असल्याचे त्याने कबुल केले. पुढील कारवाईकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.