झोपलेले महसूल प्रशासन अचानक जागे झाले पण, उर्वरित मुरूम,खडी,डबर,तसेच उत्राण परिसरातील अवैध वाळूचे काय? प्रतिनिधी l एरंडोल
एरंडोल- येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांचेसह महसूल कर्मचा-यांनी आज पहाटे टाकरखेडा,बांभोरी परिसरात अचानक धाड टाकून वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्थानकात जमा केले. प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि तहसीलदार सुचिता चव्हाण यांचेसह महसूल कर्मचा-यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.वाळूचे ठेके बंद असतांनादेखील वाळूमाफिया गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची अवैधरीत्या वाहतूक करीत होते.
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना टाकरखेडा व बांभोरी परिसरातून गिरणा नदीच्या पात्रातून रात्रीच्यावेळी वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांचेसह नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते,किशोर माळी,दिलीप पाटील,मंडळ अधिकारी मनोज शिंपी,लिपिक पंकज शिंदे,तलाठी सलमान तडवी,सुरेश कटारे,पंकज भोई,आरिफ शेख,राहुल देरंगे,कोतवाल मधुकर पाटील,पंकज सोनवणे यांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास टाकरखेडा, बांभोरी परिसरात अचानक गस्त घालून वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणा-या आठ वाहनांविरोधात कारवाई करून ताब्यात घेतले.
आठही ट्रॅक्टर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले.दरम्यान प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांचेसह महसूल पथकास पाहताच वाळू वाहतूक करणा-या ट्रॅक्टर चालकांनी वाहने पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.चार ट्रॅक्टर चालकांनी महसूल पथकासमोरच ट्रॅक्टर मधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली तर चार ट्रॅक्टर वाळूने भरलेले सापडले.नूतन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.
उत्राण, हनुमंतखेडे या परिसरातून देखील वाळूची चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असून या ठिकाणी देखील कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणा-यांविरोधात यापुढील काळात देखील कारवाई करण्यात येईल असा ईशारा प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिला आहे.दरम्यान महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकाचे नावे
1)हिरामण शालिक सोनवणे,वाहन क्रमांक एम एस 19 – 3860 ,2)जितेंद्र परशुराम सोनवणे,वाहन क्रमांक एम एस 19 – 9501.3)सतीश प्रकाश सपकाळे वाहन विना क्रमांक. 4)ज्ञानेश्वर भास्कर नंन्नवरे वाहन क्रमांक एम एस 19 -AD 6769, 5)दिनेश भागवत नंन्नवरे वाहन विना क्रमांक.6)विलास रोहिदास कोळी वाहन विना क्रमांक,7) राहुल सुधाकर कोळी वाहन विना क्रमांक, 8)दिनेश भागवत नंन्नवरे वाहन विना क्रमांक.
हे पण वाचा
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.