अॅड.किशोर काळकर यांची भा.ज.पा.प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती.

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल

एरंडोल-येथील माजी उपनगराध्यक्ष अॅड.किशोर काळकर यांची भाजपच्या जनजाती विभागाच्या प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अॅड.काळकर यांनी अॅड. काळकर याना प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.अॅड.किशोर काळकर यांनी यापूर्वी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री,विदर्भ संघटनमंत्री यासह पक्षाच्या विविध पदांवर काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून अॅड काळकर यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली असून पालिकेचे उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळी होती.अॅड.किशोर काळकर यांची जनजाती विभागाच्या प्रदेश समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर राज्यातील चार लोकसभा मतदार संघ व ४८ विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री असतांना त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याची दखल घेवून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी टाकली असून चारही लोकसभा मतदार संघ व ४८ विधानसभा मतदार संघात पक्ष संघटन मजबूत करून पक्ष बळकट करणार असल्याचे अॅड.किशोर काळकर यांनी सांगितले. अॅड.काळकर यांनी प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध संघटना तसेच भाजप पदाधिका-यांनी सत्कार केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचेसह भाजपच्या पदाधिका-यांनी अॅड.काळकर यांचे अभिनंदन केले.

हे पण वाचा

टीम झुंजार