जळगाव :- खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला अटक भुसावळ बाजारपेठ व भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात फरात असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार, १७ मार्च जळगाव शहरातील खोटेनगर येथून सापळा रचून अटक केली आहे.योगेश ऊर्फ सोनू हिरालाल मोघे वय २८ रा. आगवाली चाळ, रा.भुसावळ हल्ली मुक्काम पंचवटी, नाशिक असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
खूनाच्या गुन्ह्यातील मारेकरी असलेल्या भावाचा जामीन करण्यासाठी योगेश ऊर्फ सोनू याने खंडणी मागितल्याप्रकरणी भुसावळ शहर व भुसावळ बाजारपेठ अशा दोन्ही पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होते, या गुन्ह्यात योगेश ऊर्फ हा फरार होता. सोनू हा जळगाव शहरातील खोटेनगर येथे त्याची ओळख लपवून राहत असल्याची गोपनीय माहिती
स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हवालदार संदीप सावळे, पोलीस नाईक रणजीत जाधव, पोलीस क्रीष्णा देशमुख, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर याच्या पथकाने बुधवारी सापळा रचून खोटेनगरातून संशयित योगेश ऊर्फ सोनू यास अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.,
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






