हृदयद्रावक ! मंदिरात लग्न लागले, वर वधुत झाला वाद, दोघांनी घेतले विष, वराचा झाला मृत्यू, वधूची प्रकृती चिंताजनक.

Spread the love

इंदौर (मध्यप्रदेश) :- येथे एक धक्कादायक घटना समोर आलीआहे. लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना अचानक नवरा मुलगा आणि मुलगीने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान यात विष प्राशन केल्याने वराचा मृत्यू झाला, तर वधूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 15 महिन्यांपूर्वी दोघांची एंगेजमेंट झाली होती, त्यानंतर लग्नाची तारीख ठरल्याप्रमाणे त्यांची तयारी सुरू होती. यादरम्यान ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये मुलाच्या शरिरात विष पूर्णपणे गेल्याने रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर वधूही गंभीर अवस्थेत असल्याचे सांगितले. लग्नाच्या अवघ्या काही तासापूर्वी हा प्रकार घडल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्याने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी हे प्रकरण पोलिसांत गेले होते परंतु पोलिसांनी समझोता करून यावर पडदा टाकला होता.यानंतर तरुण काही प्रमाणात तणावाखाली होता. त्याने लग्नाला होकार दिला, मात्र लग्नापूर्वीच दोघांमध्ये कशावरून तरी वादझाला आणि दोघांनी विष प्राशन केले.

ओला कंपनीत काम करणाऱ्या दीपक अहिरवार या तरुणाचा 15 महिन्यांपूर्वी निशा नावाच्या तरुणीशी लग्न ठरले होते. शेअर मार्केटमध्ये काम करताना दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध झाले आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवलं. दरम्यान काही काळानंतर मुलगी कोणत्याही कारणावरून मुलाकडे पैशांची मागणी करायची. दीपकने निशाला अनेकवेळा समजावून सांगितले की, जोपर्यंत तो त्याचे करिअर बनवत नाही तोपर्यंत तो तिच्याशी लग्न करू शकत नाही, पण मुलगी त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. यानंतर ते दोघेही मंदिरात जाऊन लग्न करणार होते.

परंतु काही वेळ आदी दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांनी टोकाचं पाऊल उचलत विष प्राशन केले. तरुणाच्या कुटुंबीयांनी मुलीमुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोघांनीही विष प्राशन केले आहे. यामुळे पोलिसांकडून दोन्ही कुटुंबीयांचे जबाब घेतले जात आहेत. विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणीला व्हेंटिलेटरवर खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले असून, तिचीही प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना अद्याप कोणाचेही म्हणणे घेता आलेले नाही यामुळे कारण स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार