परभणी : लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहणारी प्रेयसी घरून परत येत नसल्याने चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या आईचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री 10 वाजता तालुक्यातील करम येथे घडली.तरुणाच्या हल्ल्यात प्रेयसीच्या आईचा मृत्यू झाला तर तिचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.
सोनपेठ तालुक्यातील करम येथे विमलबाई उजगरे या त्यांचा प्रियकर पंडित लोंढे यांच्या सोबत लिव्ह-इन- रिलेडानशीप राहत. विमल उजगरे यांची मुलगी मंगल गायकवाड ही मागील ८ वर्षांपासून प्रियकर बाळू मुंडे याच्यासोबत लिव्ह-इन- रिलेडनशीपमध्ये परळी येथे राहत असे.
मात्र, मुंडे चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याने मंगल आईसोबत राहण्यास करम येथे आली होती. दरम्यान, चार दिवसांपूर्वी बाळू मुंडेने करम येथे येऊन मंगलला सोबत येण्यास बळजबरी केली.
मात्र, मंगलने येण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेल्या मुंडेने विमलबाई यांना तुम्ही मुलीस माझ्यासोबत पाठवत नाहीत म्हणत हुज्जत घातली. तर सोमवारी ( दि. 15) सकाळी मंगलला फोन करून तुझ्या आईच्या जीवावर तू राहतेस,तिला संपवून टाकतो अशी धमकी दिली.
त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता मुंडेने विमलबाई व त्यांचा प्रियकर पंडित लोंढे यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच विमलबार्ई यांची सून मायाने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी विमलबाई आणि पंडित लोंढे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. विमलबाई यांचा जागीच मृत्यू झाला होता तर लोंढे यांची प्रकृती गंभीर आहे. सून माया उजगरे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात बाळू मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड हे करत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?