Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी तुम्हाला हसवतात तर कधी आश्चर्यचकित करतात. सोशल मीडियाचा प्रभावही लोकांवर इतका आहे की, जेव्हा कधी एखादी घटना समोर घडते तेव्हा सर्वात आधी खिशातून मोबाइल काढून लोक शूट करणं सुरु करतात.दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणी रस्त्यावर तुफान हाणामारी करताना दिसत आहे. तरुणी एकमेकींचे कपडे, केस ओढत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या तरुणी जणू काही एकमेकींचा जीवच घेण्याचा प्रयत्न करत होत्या.
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, एका कॅफेच्या बाहेर काही तरुणींमध्ये भांडण सुरु आहे. यावेळी तरुणी एकमेकींना वाईट पद्धतीने हाणामारी करत होत्या. लाथा, बुक्क्या मारत एकमेकींचे केस ओढत तरुणींची सुरु असलेली हाणामारी पाहण्यासाठी रस्त्यांवर लोकांचीही गर्दी झाली होती. पण याचवेळी तिथे एक पोलीस कर्मचारी येतो. तरुणींमध्ये सुरु असलेला हा हिंसाचार पाहून पोलीस कर्मचारी ना त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, ना त्यांना अटक करतो. पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पेपर स्प्रे मारतो आणि तेथून बाजूला होतो.
पेपर स्प्रे मारल्याने तरुणी घाबरतात आणि भांडण सोडून तेथून पळ काढण्यास सुरुवात करतात. यावेळी काही तरुणी डोळे चोळत पळतात तर काहीजण खोकत असल्याचं दिसत आहे. दरम्यान एका जागेवरील भांडण संपलं असलं तरी तरुणींचा दुसरा एक गट मात्र अद्यापही भांडत असतो. यानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्यावरही पेपर स्प्रे मारतो. यानंतर त्या तरुणीही भांडण सोडून तेथून पळ काढतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण मिसौरी येथील कंसास येथील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलीस कर्मचाऱ्याने ज्याप्रकारे प्रसंगावधान आणि संयम दाखवला आहे त्याचं लोक कौतुक करत आहेत. तर अनेकजण तरुणींच्या भांडणाची मजा घेत आहेत.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.