प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल : खरीप हंगामासाठी फक्त काही दिवस शिल्लक असून शेतकरी शेतीच्या मशागत करण्यात व्यस्त आहे. कोणते बियाणे घ्यावे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये जोर करत असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाड्या देखील गावोगावी फिरत आहेत. मागील वर्षी अंकुर सिड्सच्या “स्वदेशी ५” या प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
गुजरात राज्यातील आनंद व वडोदरा या ठिकाणी कापसाचे वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते, मात्र तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली असून तंबाखू उत्पादनावर भर दिला आहे.
त्यामुळे या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली ‘स्वदेशी ५’ बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन बी. एस. मोरे कृषि अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांनी केले आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम