पत्नी पळाली प्रियकरासोबत दागिने, रोकड घेवून, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल

Spread the love

पुणे : अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराबरोबर घर सोडून जाताना घरातील रोकड, साडेपाच तोळे सोन्याचे दागिने तसेच माहेरच्या घरातून रोकड तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरुन नेली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीने आईच्या प्रियकराने आपला विनयंभगकेल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

याबाबत कर्वेनगरमध्ये राहणार्‍या एका ४३ वर्षाच्या पतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवानंद श्रीमंत वाले (वय २९, रा. कर्वेनगर) व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ मध्ये तसेच १८ एप्रिल २०२३ रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद याने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून त्यांच्या मुलीची उंची वाढविण्यासाठी व्यायाम घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे येणे जाणे सुरु केले. फिर्यादी यांची १५ वर्षाच्या मुलीला व्यायामा दरम्यान घाम आला का हे बघण्याच्या बहाण्याने तिचा टी शर्ट वर करुन तिच्या शरीरावर नको तिथे हात लावून तिचा विनयभंग करत असे. असा प्रकार दोन तीन वेळा करुन तिच्या मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले. ही बाब कोणाला सांगू नको, म्हणून तिला धमकाविले होते.

शिवानंद याच्याबरोबर फिर्यादीच्या पत्नीने अनैतिक संबंध निर्माण केले. त्यातून ती घरातून पळून गेली.
जाताना तिने घरातील ५० हजार रुपये रोख, १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने तसेच माहेरच्या घरातून ३० हजार
रुपये तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरुन नेले.
हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीच्या मुलीने वडिलांना आपलाही त्याने विनयभंग केल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रायकर
अधिक तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार