धरणगाव शिवसेना (उबाठा) संघटनात्मक बांधणी/पक्ष धोरण संदर्भात तालुका बैठक संपन्न….

Spread the love

धरणगाव :- शिवसेना(उबाठा) च्या वतीने दि.20 रोजी इंदिरा कन्या विद्यालयात वंदनीय पक्षप्रमुख उध्दव जी ठाकरे यांच्या आदेशावरून व जिल्हा संपर्कप्रमुख संजय जी सावंत यांच्या सूचनेनुसार मा.गुलाबराव जी वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व सचिन असबे जळगाव ग्रामीण विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत पक्षाची संघटन बांधणी व पक्षाचे ध्येय धोरणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पक्ष संघटन व पक्षाची धोरणे शेतकरी वर्ग तसेच सर्व सामान्य जनतेत कोणत्या पध्दतीत मांडावीत. तळागाळातील शिवसैनिक पक्षाशी कश्या पध्दतीने जोडला जाईल याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण विचार गुलाबराव वाघ यांनी बैठकीत मांडले. सचिन असबे,सुरेश नाना चौधरी,शरद माळी व जयदीप पाटील यांनी बैठकीत मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर तालुका बैठकीत सुरेश नाना चौधरी संचालक मार्केट कमिटी ,ॲड शरद माळी जिल्हा संघटक,निलेश चौधरी युवा सेना जिल्हाप्रमुख,राजेंद्र ठाकरे जिल्हा उपसंघटक,जानकीराम पाटील माजी जि.प.उपाध्यक्ष,जयदीप पाटील तालुका प्रमुख,नंदू पाटील उपतालुका प्रमुख,लिलाधर पाटील तालुका संघटक,विजय पाटील तालुका प्रमुख शेतकरी सेना,भागवत चौधरी शहर प्रमुख तसेच तालुक्यातील व शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार