चाळीसगाव : तालुक्यातील मेहुणबारे व दरेगाव येथे उष्माघात सदृश लक्षणांनी दोघांचा मृत्यू झाला.यात दरेगाव येथील शेतमजूर व मेहुणबारे येथील राजेंद्र कोळी यांचा मृत्यू झाला आहे.
दरेगाव येथील हरसिंग रायसिंग गायकवाड (वय ६०) या शेतमजुराचा शुक्रवारी दुपारी अकस्मात मृत्यू झाला. त्यांना कुठलाही आजार नव्हता. ते घरापासून गावातील काही अंतरावरील एका दुकानापर्यंत गेले. तेथून घरी आल्यावर ते एकाकी जमिनीवर कोसळले. शेजारील नागरिकांनी धाव घेऊन त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दुसरी घटना मासे पकडताना आले चक्कर. दुसऱ्या घटनेत मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील इंदिरानगरातील राजेंद्र शिवाजी कोळी (वय ४५) हे शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास सहकाऱ्यांसह खडकीसीम धरणात काठावरील पाच ते सहा फूट पाण्यात चारचाकी वाहनाचे ट्युबवर बसून मासेमारीचे जाळे टाकून मासे पकडत होते. मासेमारी करीत असताना त्यांना अचानक चक्कर आल्यासारखे वाटले व ट्यूबवरून पाण्यात पडले.
त्यांचे भाऊ व इतर साथीदारांनी त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढले व तत्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लक्ष्मण कोळी याने दिलेल्या खबरीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.