Viral Video: प्रियकर आपल्या प्रेयसीला शॉपिंग कार्टमध्ये बसवू फिरवतो,अस घडले की तुम्ही कल्पना ही करू शकत नाही पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी नेहमी काहीना काही नवीन गोष्टी पाहायला मिळत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.
यामधील अनेक व्हिडिओ हे खूपच मजेशीर असतात जे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात.

या व्हिडिओंमध्ये तुम्ही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे अनेक व्हिडिओ पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला शॉपिंग कार्टमध्ये बसवू फिरवताना दिसतो. पण पुढे जे काही होते ते पाहून तुम्हाला धक्कासुद्धा बसेल आणि हसायला देखील येईल.

सोशल मीडियावरव्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला शॉपिंग कार्टमध्ये बसवतो आणि नंतर या कार्टला पाठीमागून धक्का देत ते रस्त्यावरुन पळवू लागतो. या तरुणाने पायामध्ये स्केटिंग शूज घातले आहे. तो खूपच स्पीडमध्ये हे शॉपिंग कार्ट ढकलताना दिसत आहे. पण पुढे जे काही घडते ते खूपच धक्कादायक आहे याची कल्पना कोणीच करु शकत नाही.

वेगाने रस्त्यावरुन जात असताना अचानक स्पीड ब्रेकर येतो आणि हा तरुण गर्लफ्रेंड बसलेली शॉपिंग कार्टवरील हात सोडून देतो. ही तरुणी कार्टसोबत पुढे जाते आणि जमिनीवर जोरात पडते. या अपघातामध्ये शॉपिंग कार्टचे चाक देखील तुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून या तरुणीला चांगलीच दुखापत झाली असल्याचे दिसत आहे.

@couldgowrongvid नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘शॉपिंग कार्ट.’ यासोबतच हसणारा इमोजीही पोस्ट करण्यात आला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, ‘माझा दिवस बनवल्याबद्दल धन्यवाद. हे पाहून हसता हसता माझ्या डोळ्यांत अश्रू आले.’आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘आपण सर्वांजवळ एक असा मित्र असतो जो शेवटच्या क्षणी धोका देतो.’ या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

हे पण वाचा


टीम झुंजार