पोट साफ होतच नाही? चमचाभर तूप आणि चिमूटभर सैंधव मिठाचा १ सोपा असरदार उपाय

Spread the love

Constipation Ayurvedic Home Remedies : गॅस्ट्रोपेरिसिस असलेल्या व्यक्तीला पोटात सूज येणं, पोटदुखी, उलटी, एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

अनियमित जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे पोट साफ न होण्याचा त्रास उद्भवतं. सकाळी व्यवस्थित पोट साफ झालं नाही तर संपूर्ण दिवसच खराब जातो. पोट साफ होण्यासाठी काही आयुर्वेदीक उपाय परिणामकारक ठरू शकतात. गॅस्ट्रोपेरिसिस अशी स्थिती आहे. ज्यामुळे मांसपेशीवर परीणाम होतो आणि पचनसंस्था मंदावते. यामुळे पोट साफ होणं कढीण होतं. (Constipation Ayurvedic Home Remedies) गॅस्ट्रोपेरिसिस असलेल्या व्यक्तीला पोटात सूज येणं, पोटदुखी, उलटी, एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

पोट साफ न होण्याचा त्रास उद्भवू नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा

Pic for Google

1) पाणी तुमच्या पोटातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हायड्रेट राहून पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय सकाळी सगळ्यात आधी कोमट पाणी प्यायल्यानं कोलन स्वच्छ होण्यास मदत होते.

2) एक ग्लास कोमट पाण्यात 2-3 चमचे गुलाबी किंवा समुद्री मीठ मिसळा आणि ते रिकाम्या पोटी प्या. हे काही मिनिटांत तुमचे कोलन साफ ​​करेल.

3) फायबर्स तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्यास फायदेशीर ठरतात हेल्दी कोलन साठी हे इंधनाप्रमाणे काम करतात. हाय फायबरमध्ये अनेक फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. जसं की सफरचंद, पिअर, स्ट्रॉबेरी, गाजर यांमध्ये फायबर्स असतात. इतर फायबर्सयुक्त पदार्थांमध्ये बीन्स, दाळी, चणे,क्विनोआ, ओट्स यांचा समावेश होतो.

4) आलं आणि लाल मिरचीसारख्या औषधी पदार्थांमध्ये रोगाणूंविरोधी फायटोकेमिकल्स असतात. यामुळे खराब बॅक्टेरीया दाबले जातात आणि गॅस, एसिडिटीपासून आराम मिळवण्यास मदत होते.

5) पोट साफ करण्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह उपायांमध्ये आल्याचा समावेश होतो. आलं एंटीऑक्सिडंट्सयुक्त असते. यामुळे कोलनमधील सूज कमी होते आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी होतो.

कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळण्याचा आयुर्वेदीक उपाय

https://www.instagram.com/reel/CsFpzdrp9-7/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

जेवताना जर तुम्ही २ चपात्या खात असाल तर १ चपाती खाल्ल्यानंतर चमचाभर तुपात चिमुटभर सैंधव मीठ घाला आणि ते खा. नंतर उरलेलं जेवण पूर्ण करा. या उपायामुळे अन्नाची हालचाल सुरळीत होते आणि आतड्यांमधील अन्न सहज पुढे ढकलले जाते. अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट देखील साफ राहते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार