एरंडोल :- एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (संजय पवार गट) तोपक्षीय पॅनलच्या उमेदवारांनी सर्वच्या सर्व 15 जागेवर एकतर्फी विजय प्राप्त करून विरोधकांचा धुव्वा उडवला. सर्वपक्षीय पॅनलच्या महिला राखीव मतदार संघातून मतदानापूर्वीच दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या यामध्ये१) सोनल संजय पवार २) प्रतिभा दिनेश पाटील या दोघा महिला गटातून बिनविरोध विजय झाल्या होत्या. उर्वरित 13 जागेसाठी मतदान झाले होते.
सर्व पक्षीय पॅनलचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी सी पाटील यांनी केले.आज सकाळी दादासाहेब पाटील महाविद्यालयाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली निकाल जाहीर होताच सर्वपक्षीय पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ- भगवंतराव नारायण पाटील (81) प्रकाश ओंकार महाजन(78) संजय माणिक जाधव (77) धनराज देवराम महाजन(77) गजानन धनसिंग पाटील(74) पवन संजय सोनवणे(73) सुमनबाई गोविंदा पाटील(70)
सर्व साधारण व्यक्तीच्या मतदारसंघ- रवींद्र बाबुराव चव्हाण (491) ज्ञानेश्वर भादु महाजन (469) विनोद निळकंठ पाटील (427)
इतर मागासवर्ग मतदारसंघ – संभाजी शिवाजी चव्हाण (615)
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ- कांचना गरीबदास अहिरे (578)
वि.जा.भ.जमाती व विशेष मागास प्रवर्ग – रवींद्र भिमसिंह जाधव (545)
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी सी पाटील व सर्व विजय उमेदवार जाऊन पद्मालय येथे जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्व विजय उमेदवारांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.