प्रतिनिधी l अमळनेर
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील ३४ वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक २१ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील ३४ वर्षीय तरुण दीपक हिरालाल मराठे याने दिनांक २१ रोजी घरी कोणी नसताना राहत्या घरी स्वयंपाक घरात छताच्या लाकडी सरीला दोरीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली.
त्याचे वडील हे बकरी चारण्यास गेले होते व आई ही प्रेतयात्रेस गेली असल्याने तो घरी एकटा होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी तो लग्न होत नसल्याच्या विवंचनेत असल्याचे माहिती मिळाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना भरत गायकवाड हे करीत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.