नवरा सतत दारू पिऊन त्रास देतो,म्हणून प्रियकराच्या मदतीने केला त्याच्या खून,मृतदेह फेकला विहिरीत, अन् नवरा हरवल्याची केली तक्रार

Spread the love

पुणे :- जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना दौंड तालुक्यात समोर आलेली असून आपला नवरा सतत दारू पिऊन त्रास देत असल्याकारणाने पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केला सोबतच त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिलेला आहे. आपला नवरा हरवल्याची तक्रार देखील तिने स्वतःहून पोलिसात दिली मात्र अखेर तिच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फुटले आणि अखेर तिला हातात बेड्या पडलेल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील भांडगाव इथे हा प्रकार घडलेला असून शितल सुनील जगताप आणि तिचा बॉयफ्रेंड असलेला अतुल प्रभाकर चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भांडगाव येथे शितल ही तिचा पती सुनील जगताप यांच्या सोबत राहत होती मात्र सुनील याला दारूचे व्यसन असल्याकारणाने शितल हिचे गावातील अतुल चौगुले याच्यासोबत प्रेम संबंध सुरू झाले. त्यांच्या प्रेमसंबंधाला पतीचा सातत्याने अडथळा होत होता.

शितल जगताप आणि तिचा प्रियकर अतुल चौगुले यांनी 15 मे 2023 रोजी पहाटे सुनील जगताप घरासमोर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. 17 मे रोजी शितल हिने यवत पोलीस ठाण्यात दाखल होत आपला पती बेपत्ता झालेला आहे अशी तक्रार दिली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनील जगताप यांचा मृतदेह परिसरातील एका विहिरीत आढळून आला त्यावेळी त्याच्या डोक्याला जखमा असल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि पत्नीला बोलावून उलटचौकशी सुरू केली त्यावेळी हा प्रकार समोर आला.

विशेष म्हणजे पोलिसांनी ज्यावेळी शितलला चौकशीला बोलावले त्यावेळी तिच्या प्रियकराला देखील बोलावण्यात आलेले होते आणि दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी बसवून पोलिसांनी माहिती घेतली त्यावेळी त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने संशय बळावला आणि अखेर त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे. सुनील याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून दिलेला होता तसेच रक्ताने माखलेले त्याचे कपडे घरासमोर जाळून पुरावा नष्ट केला असे देखील त्यांनी सांगितलेले असून यवत पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार