कन्नड :- तालुक्यातील जवखेडा बु. येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१८ मे) पोस्को कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तर याच तरुणाला पीडितेच्या वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत आरोपी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवखेडा बु. येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दळण दळण्यासाठी गावातील गिरणीमध्ये गेली होती. दळण्याचे पैसे आणण्यासाठी घरी जात असताना वाटेतच आरोपी सतीश सुरेश शिखरे(वय ३०) याने मुलीच्या ओढणीने मुलीचे तोंड दाबून घराजवळच असलेल्या शेतीचे अवजारे व सरपन ठेवलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ओढत नेऊन बळजबरी केली. मुलीने जोरजोरात आरडाओरडा केल्याने आई-वडील धावत येऊन मुलीची कशीबशी सुटका केली. वडील रमेश नरवडे यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी सतीश शिखरे यास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
गंभीर जखमी झाल्यामुळे शिखरे यास तातडीने ग्रामीण रुग्णालय पिशोर येथे नेले असता प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले. शुक्रवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सतीश सुरेश शिखरे याचा मृत्यू झाला. आरोपी सतीश शिखरे यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण आणि आरोपी
युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी आरोपी रमेश नरवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश बडे बीट अंमलदार लालचंद नागलोत हे पुढील तपास करीत आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?