अडावद ता. चोपडा प्रतिनिधी (डॉ सतिश भदाणे )
पावसाळा महिन्याभरावर आला असून त्यापूर्वी शेतकरी बी-बियाणे खरेदी करून ठेवतात. मात्र काही ठिकाणी बनावट बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. अशातच चोपड्यात बनावट कापूस बियाण्याची पाकीटे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक २४ मे २०२३ रोजी पहाटे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव श्री.अरुण तायडे यांना गुप्त माहितीच्या आधारे चोपडा शहराच्या बाहेरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल न्यू सुनिता मध्ये बनावट स्वदेशी-५ या नावाच्या वाणाची कापूस बियाणे साठा ठेवला आहे अशी गुप्त खबर मिळाली.
त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव श्री.अरुण तायडे यांनी चोपडा पोलिसांच्या मदतीने हॉटेल न्यू सुनितामध्ये जाऊन चौकशी केली असता संशयित श्री संदीप आधार पाटील रा.वर्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी गाडी खराब झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या भरून कापूस बियाणे हॉटेलमध्ये ठेवले होते असे हॉटेलच्या मॅनेजर अमोल राजपूत यांनी सांगितले.
त्यावरून श्री.तायडे यांनी चोपडा पोलीस स्टेशन येथे बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संशय श्री आधार पाटील या.वर्डी रा.चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून बनावट स्वदेशी-५ या कापूस बियाण्याची सुमारे १ लाख रुपये किमतीची ९५ पाकिटे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.