बैलगाडीस मागून दुचाकीची जोरदार धडक दिल्याने एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील 29 तरुणाचा जागीच मृत्यू.

Spread the love

एरंडोल :- तालुक्यातील आडगाव येथील 29 वर्षीय तरूण कासोदा रस्त्यावर शिवाजीनगर कडे दुचाकीने जात असताना बैलगाडीस मागून जोरदार धडक दिल्याने तरुणाच्या मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या वेळेस घडली. याबाबत माहिती अशिकी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे दिनांक 23 रोजी रात्री 10 वाजता आडगाव येथील रहिवासी सागर रघुनाथ माळी वय 29 हा त्याचा मित्रा सोबत मोटार सायकलने आडगाव ते कासोदा रस्त्यावर गावातील शिवाजी नगर कडे जात असताना

पुढे कासोदा कडे जाणाऱ्या बैल गाडी ला मागुन मोटारसायकल ने धडक दिली यावेळी त्याच्या छातीला जोरात मार लागल्यामुळे त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले व शेवविच्छेदन करून दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा पश्चात आई, वडील ,एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे तो सेवानिवृत्त पोस्टमन रघुनाथ नागो माळी यांचा मुलगा होता

हे पण वाचा

टीम झुंजार