शेतकऱ्यांना उन्हात सोडून गिरीश महाजन थंड हवेच्या ठिकाणी गेलेत – एकनाथराव खडसे.पहा व्हिडिओ

Spread the love

महाजनांचे आमरण कापुस आंदोलन म्हणजे नौटंकी होती काय असा सवाल जामनेर( प्रतिनिधी):- कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी मागील हंगामातील कापुस अजूनही चांगला भाव मिळेल या आशेने घरातच ठेवलेला असून.पुढील हंगामाच्या पुर्व मशागतीच्या कामाला शेतकरी लागला आहे. तरीही या सरकारला जाग कशी येत नाही.कापुस,मका,ज्वारी, या पिकांना भाव मिळावा यासाठी शेतकरी त्रस्त असुन मंत्री महाजन मात्र कुटुंबातील सदस्यां सोबत थंड हवेच्या ठिकाणी जावुन बसलेत.हि शोकांतिका आहे.

असे आमदार एकनाथराव खडसे यांनी जामनेर येथे शेतमालाला चांगला भाव मिळावा या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जामनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्थळी ते बोलत होते..यावेळी राष्ट्रवादीचे मेहबुब शेख,जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील,युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,प्रदेश सदस्य संजय गरूड, तालुकाध्यक्ष विलास राजपूत,विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,शहराध्यक्ष माधव चव्हाण,आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आघाडीच्या सरकारच्या काळात ज्वारीला २७५० रूपये भाव देण्यात आला.तर आजच्या घडीला फक्त १२०० रूपये भाव शेतकऱ्यांच्या ज्वारीला मिळत आहे. या सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर मागील काळात महाजन यांनी कापसाला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण केले होते.

आता ते सत्तेत असुनही शेतकऱ्यांचा घरात पडुन असलेल्या कापसाला भाव मिळवुन देण्यासाठी का पुढाकार घेत नाही.की ते आमरण उपोषण फक्त नौटंकी होती.असे म्हणायला हरकत नसावी.तर महाजन यांचे मागील फर्दापुर प्रकरण आपण मिटवले नाही तर त्यांची परिस्थिती आज वेगळी राहीली असती असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमां समोर बोलून दाखवले.

हे पण वाचा

टीम झुंजार