सरपंच, ग्रा.पं.पदाधिकारी तसेच शेतकरी महीला यांच्या समस्या प्रती तरी सरकारने संवेदनशील असले पाहिजे. सौ सुषमा देसले पाटील

Spread the love

प्रतिनिधी l कराड

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, ॲड विकास जाधव, राजू पाटील सौ सुषमा देसले पाटील यांच्या नेतृत्वात कराड ते सातारा पायी मोर्चा सुरूवात झाली सदर मोर्चा त राज्यातील हजारो सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत सदर मोर्चा तीन टप्प्यात पुढे आलेला असून आज चौथा टप्पा सुरू झालेला आहे

तरीही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी यांच्या मागण्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे पंचायतराज पदाधिकारी व शेतकरी या घटकाचा अवमान म्हणजे ग्रामीण भागातील मतदारांचा अपमान आहे त्यामुळे तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामीण भागातील मतदार अपमानाचा बदला येत्या निवडणुकीच्या माध्यमातून घेईल असे यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सांगितले

कराड ते सातारा पायी मोर्चा व तेथून पुढे वाहनाने थेट मंत्रालयावर धडक असे दोन टप्प्यांमध्ये मोर्चाचे नियोजन केलेल्या असून याबाबतीत दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री कृषिमंत्री यांच्यासह सर्व विभागांना निवेदन देऊन कळवलेले होते मोर्चा सुरू होऊन तिसरा दिवस आहे प्रचंड उन्हाचा तडाका आहे काल वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता तरीही हजारो सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोर्चा चालत होते याचा अध्यक्ष शासनाने विचार केला नाही ही दुर्दैवी बाब आहे शासनाने अधिक विलंब न लावता मोर्चा साताऱ्यात धडके पर्यंत ठोस निर्णय घेऊन मागण्या मान्य न केल्यास सरकारमधील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरणे कठीण होईल आंदोलन आक्रमक झाल्यास कठीण परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा असे आव्हान यावेळी विकास जाधव यांनी केले

या मोर्चामध्ये शेकडो महिला सहभागी आहेत त्या रखरखत्या उन्हात चालत आहेत सरकारला थोडीही दयामाया दिसून येत नाही ही गंभीर बाब आहे .सरकारने. सरपंच महिला व शेतकरी यांचे विषयी तरी संवेदनशील असले पाहिजे असे यावेळी सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या प्रमुख सौ सुषमा देसले पाटील यांनी सांगितले. यावेळी सरपंच परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख संजय जगदाळे प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस आनंद जाधव आबासाहेब सोनवणे किसनराव जाधव अनिल सोनमळे वनिता सुरवसे साधना चव्हाण दिपाली चोरगे तेजश्री चव्हाण विकास माने कृष्ण काशीद अभिजीत जाधव शत्रुघ्न धनवडे संजय शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

हे पण वाचा

टीम झुंजार