“लग्नाचं सुखही नाही, मला मूलबाळ नाही” सात वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या पतीला पॅरोलवर सोडा पत्नीने केली याचिका दाखल.

Spread the love


ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) :- शहरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने ७ वर्षांपासून सेंट्रल जेलमध्ये असलेल्या पतीच्या पॅरोलची मागणी केली आहे. आई बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने ही मागणी केली आहे.यासोबतच आरोपीच्या वडिलांनीही आजोबा होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नी आणि वडिलांनी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज केला आहे.

शिवपुरी क्षेत्रातील मनियर भागात राहणारा दारा सिंह जाटव याला लग्नाच्या एका वर्षानंतर खून प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे त्याला कोणतेही मुलबाळ झाले नाही. तसेत आरोपीच्या वडिलांचे आजोबा बनन्याचे स्वप्न देखील अधूरे राहीले. आरोपी दारा सिंह ७ वर्ष झाले कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला आतापर्यंत पॅरोल देखील सोडले नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने ग्वाल्हेर सेंट्रल जेलच्या अधीक्षकांना आई बनण्याची आणि सासरे करीम सिंह जाटव यांची आजोबा होण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने अर्ज दिला आहे.

आरोपी दारा सिंहची पत्नी म्हणाली, लग्नाच्या एक वर्षानंतरच तिच्या पतीला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे दोघांनाही मुलाच्या नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. त्याचबरोबर माझ्या सासू-सासऱ्यांचेही वय देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनाही आजी-आजोबा होण्याचे सुख हवे आहे.
आपल्या मुलाला भेटण्याच्या इच्छेने आरोपीच्या आईची प्रकृतीही ढासळू लागली आहे. तिला लवकरात लवकर नातवंडांचे सुख तिच्या सासू-सासऱ्यांना द्यायचे आहे, त्यामुळे पॅरोलसाठी अर्ज केल्याचे दारा सिंहच्या पत्नीने सांगितले आहे.

पोलीस अधीक्षक विदित सिरवैय्या म्हणाले, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला पॅरोलवर सोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आहे. कारागृहात आल्यानंतर दोन वर्षे आरोपीचे वर्तन चांगले राहिल्यास तो जामिनास पात्र ठरतो आणि त्याची पॅरोलची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो.

हे पण वाचा

टीम झुंजार