मुडी प्र. डांगरी येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांची कारवाई…

Spread the love

अमळनेर :- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे अवैध देशी दारूची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशाने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता

मूडी प्र. डांगरी गावाच्या बाहेर लोण रोडवर एक इसम बियर शॉपीच्या बाजूला शेतात पत्री शेडमध्ये पिशव्या घेवून बसल्याने आढळल्याने त्यास पकडले असता त्यांच्याकडून देशी दारुच्या दहा बाटल्या जप्त करण्यात आल्या असून आरोपी बाबूलाल रतन याच्याविरुद्ध पोना भारत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना हे करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार