अमळनेर : लहान मुलांना बिडी तंबाखू सारखे पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळल्यावरून मारवड पोलिसांनी दोन पान टपरी चालकांवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे.
तालुक्यातील निम येथे पानटपऱ्यांवर लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थ व बिड्या विक्री केल्या जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे , पोलीस नाईक मुकेश साळुंखे याना छापे टाकण्यास सांगितले.
पोलिसांनी निम -तांदळी रस्त्यावर मराठी शाळेजवळ रावसाहेब शिवाजी पाटील (वय ३३) याच्या प्रसन्ना पान सेंटर व निम -कपीलेश्वर रस्त्यावर गणेश बन्सीलला भिल (वय २६) यांच्या कुणाल पान सेंटरवर छापा टाकला असता तेथे बंदी असलेले तंबाखू ,बिडी,सिगारेट असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी साहित्य जप्त करून मुकेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने व जाहिरात प्रतिबंधक व व्यापार वाणिज्य उत्पादने पुरवठा व वितरण यांचे अधिनियम २००३ कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






