रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार, व्हिडीओ करून ब्लॅकमेल करीत होते.

Spread the love

बीड :- एका विधवा महिलेवर सात जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडीओ करून महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स रिक्षामध्ये विसरली होती. ती परत देण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाने महिलेच्या घरात प्रवेश करत महिलेवर आत्याचार केला. याचा व्हिडीओ काढून त्याने त्या महिलेला ब्लॅकमेल करत इतरांना देखील शारिरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार करून

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गोरख इंगोले याने 2020 मध्ये जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरुड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले. तिथे गेल्यावर त्याच्या 4 मित्रांकडून महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान महिला गर्भवती राहिली. त्यामुळे गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.

नेहमीच्या या सर्व अत्याचाराला कंटाळून पीडित महिला माजलगावला आली. तिथे एका हॉटेलमध्ये नोकरी करु लागली. पण येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे वारंवारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तर संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार