प्रतिनिधी | एरंडोल :- तालुक्यातील तळई येथे दि.27 रोजी संध्याकाळी 8 वाजता ग्रामपंचायतिच्या वतीने विकास कामांचा शुभारंभ व सत्कार सोहळा आयोजित केला होता. गावातील विकास कामांचा शुभारंभ जळगाव जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील,पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांच्या हस्ते करण्यात आला.व सत्कार सोहळा देखील करण्यात आला. या विकास कामांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना (अंदाजित रक्कम 4 कोटी रुपये),भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर योजने अंतर्गत संविधान सभागृह, व रस्ता काँक्रीटिकरण, व अन्य कामांचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच गावातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक एस.एम.माळी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या देखील सत्कार करण्यात आला,गावातील पाणीपुरवठा नियोजन बद्ध करणारे विनोद शिवाजी पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला,व गावातील शासकीय नोकरीला लागलेले तरुण व पालकांचा देखील सत्कार सोहळा करण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांच्या माजी सभापती प्रभाकर दादाजी पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी सत्कार केला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले विचार मांडत असताना जुनी आठवण करून दिली की तळई गावामुळे,एरंडोल तालुक्यामुळे मोठा झालो आहे,आणि गावात आल्यावर मला खुप आत्मीक आनंद झाला असे गुलाबराव पाटील यांनी सागितले.तसेच आमदार चिमणराव पाटील यांनी देखील आपले विचार मांडत असताना सांगितले की तळई गावासाठी 15 कोटी रुपये निधी दिला व यापुढे देखील निधीची कमतरता भासु देणार नाही अशी ग्वाही दिली.तसेच करण पवार यांनी देखील आपले विचार मांडत असताना सांगितले की तळई गावासाठी जे माझ्या परीने करता येईल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल असं सांगितले.
कार्यक्रम सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कंखरे यांनी तर प्रास्ताविक प्रभाकर पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबाराव पाटील,आमदार चिमणराव पाटील,पारोळा नगराध्यक्ष करण पाटील,जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, माजी सभापती ओंकार नाना,माजी सभापती अनिल महाजन, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी,शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र जाधव,एरंडोल शहर प्रमुख आनंदा चौधरी ,कमलेश पाटील,किरण शांताराम पाटील,बाळू धनगर,संजय पाटील,संभाजी पाटील ,शांताराम चव्हाण,व तालुक्यातील अन्य पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,गावातील माजी सरपंच,गावातील विविध पदाधिकारी, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






