एरंडोल :- शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत संगायो कार्या. २०१९ पासून चे आजपावेतो चे पूर्तता केलेले लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवा.
रिपब्लिकन आठवले पक्षाच्या वतीने मागणी. तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
रिपब्लिकन आठवले पक्षाच्या वतीने तहसीलदार एरंडोल यांना ०९/१२/२०२१ चे निवेदन २) २२/०९/२०२२ चे निवेदन असे दोन वेळा तसेच पक्षाच्या वतीने आपणास वेळोवेळी संदर्भीय निवेदने सादर करण्यात आलेले आहेत.
तसेच नागरिकांनी त्रुटी ची पूर्तता दिलेली असताना मात्र नागरिकांना शासकीय योजना पासून वंचित ठेवले जात आहे. मंजूर लाभार्थ्यांना दरमहा सदर चे अनुदान वितरित न करता संगायो कार्यालयात नागरिकांना, केंद्राचे अनुदान आले नाही, राज्याचे अनुदान आले नाही , असे सांगितले जाते. ४-५ महिने अनुदान थांबविले जाते.
एकीकडे महाराष्ट्र राज्य सरकार शासन आपल्या घरी या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी अभियान राबवीत असताना
आपल्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हाधिकारी जळगाव, उप विभागीय अधिकारी अधिकारी, तहसीलदार एरंडोल अहोरात्र परिश्रम घेऊन युद्ध पातळीवर काम सुरू असताना मात्र, दुसरीकडे एरंडोल संगायो कार्यालयात मात्र वरील प्रमाणे नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवत आहेत.
पुनश्च विनंती की, संगायो कार्यालयातील सन २०१९ पासूनचे आज पावेतो चे त्रुटी पूर्तता केलेले नागरिकांना शासकीय योजना लाभ तात्काळ मंजुर करण्यात यावे.
अन्यथा तमाम नागरिक उपरोक्त पक्षाचे शिष्टमंडळ दिनांक ०३ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वरील प्रकारावर चर्चा करणार आहोत.व सर्वस्वी जबाबदार संगायो एरंडोल विभागातील कर्मचारी/ अधिकारी राहतील असे निवेदनातून कळविण्यात आलेले आहे. सदर निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुकाप्रमुख तथा उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रवीण बाविस्कर, रिपब्लिक पक्षाचे तालुका सचिव तथा उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य देवानंद बेहेरे, रिपब्लिक पक्षाचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य सुनिल खोकरे, चिटणीस गजानन पाटील, अपंग आघाडीचे सिताराम भाऊ मराठे यांच्या सह्या आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






