जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
वृषभ :-
सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.
मिथुन :-
आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पटवून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.
कर्क :-
मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्यांचा सल्ला मिळेल. कागदपत्रांची योग्य जुळवणी करावी लागेल. मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.
सिंह :-
विसंवादाचे कारण उकरून काढू नका. मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. प्रेमवीरांनी नसते साहस करू नये.
कन्या :-
कामे मन लावून करणे गरजेचे आहे. व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक फायद्यावर लक्ष केंद्रित राहील.
तूळ :-
मुलांबाबत चिंता निर्माण होईल. आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल. कौटुंबिक सौख्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.
वृश्चिक :-
प्रेमप्रकरणाला कलाटणी लागू शकते. उगाच राईचा पर्वत केला जाईल असे होऊ देवू नका. कामाव्यतिरिक्त इतर भानगडी निस्तराव्या लागतील. वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.
धनू :-
महत्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. छोट्याश्या अपयशाने खचून जाऊ नका. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. जोडीदाराशी मनमोकळा वार्तालाप करावा.
मकर :-
बिनधास्तपणे वागून चालणार नाही. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. वयोवृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन कामात अधिक कष्ट पडतील. लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता.
कुंभ :-
महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अती हटवादीपणा चालणार नाही. महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.
मीन :-
मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाजूंचा नीट अभ्यास करावा. स्थावर संबंधीचे प्रश्न उद्भवू शकतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. कोर्टाची कामे निघू शकतील.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






