ओडिशातील बालासोरनजीक तीन रेल्वेच्या भीषण अपघात, 70 जणांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी.

Spread the love

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, रेल्वेमंत्री अश्विनी वैश्वन यांनी केली मदत जाहीर,मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख,गंभीर जखमींना 2 लाख. ओडिशातील बालासोरनजीक आज, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 20 मिनीटांनी तीन गाड्यांचा अपघात झाला. यात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 350 जण जखमी झाले आहेत. कोरमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर त्याच्या डब्यांची शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडक बसली. त्यामुळे या अपघाताची व्याप्ती वाढली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. ही ट्रेन दुपारी 3.15 वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली. बालासोर, ओडिशापासून 40 किलोमीटर दूर, बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली.आतापर्यंत 50 हून अधिक प्रवाशांना बहनगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेमंत्र्यांची मोठी मदत जाहीर! मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख. ओडिशातील बालासोर येथे आज (शुक्रवार) संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (१२८४१) आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली.रेल्वेची टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. यामुळे एकूण १७ ते १८ डबे रुळावरून घसरले आहेत.दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्वन यांनी मोठी मदत जारी केली आहे.

ओडिशातील या दुर्दैवी रेल्वे अपघातातील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमींसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जारी केली आहे. या अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, गंभीर जखमींसाठी २ लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या अंदाजे २०० प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय ३२ जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की लोकांना नेण्यासाठी सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस बोलावण्यात आल्या आहेत

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले. ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातात 70 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सुमारे 350 जण जखमी झाले आहेत.ज्या गाड्या रद्द आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत, याची सविस्तर माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे. यामध्ये अनेक मेल गाड्या आणि एक्सप्रेसचा समावेश आहे. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी अपघाताच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली असून आज ते घटनास्थळी भेट देणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली असून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये तर गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या लोकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण आहे की, रेल्वेचे अनेक डब्बे अक्षरशः कापले गेले आहेत. दोन एक्सप्रेस आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. सुरुवातीला एक ट्रेन रुळावरुन घसरली त्यानंतर त्यावर दुसरी गाडी आदळली आणि त्यांना दुसऱ्या रुळावरुन धावणारी मालगाडी धडकली, अशी माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त ; पीएम मोदींची रेल्वे मंत्र्यांसोबत केली चर्चाओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेने दुःखी असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.या अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी यांनीदेखील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यूची माहिती कळताच अतीव दु:ख झाले असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले.

कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहनगा बाजार स्थानकावर हा अपघात झाला. या अपघातात 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत.घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक नियंत्रण कक्षात पोहोचले. ते म्हणाले की, या भीषण रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा मी नुकताच आढावा घेतला आहे. उद्या सकाळी, शनिवारी घटनास्थळी भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री पटनायक यांनी म्हटले.ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी आहे. 600-700 बचाव दलाचे जवान काम करत आहेत. रात्रभर बचावकार्य सुरू राहणार आहे. सर्व रुग्णालये सहकार्य करत आहेत. पीडितांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. अपघातात 50 जणांचा मृत्यू झाला असून 132 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टीम झुंजार