CCTV VIDEO:घाईघाईत ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा तोल गेला, RPF महिला कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे वाचले तिचे प्राण.

Spread the love

CCTV Viral Video :- रेल्वे अपघाताचे अनेक प्रसंग स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर येतात. मागील काही दिवसात आरपीएफ कर्मचाऱ्यांनी अनेक प्रवाशांचा प्राण वाचवल्याचे व्हिडीओ देखील समोर आले होते.तेलंगणातून असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलने घाईघाईत ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे. बेगमपेट रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महिला कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.लिंगमपल्ली-फलकनुमा ट्रेनमध्ये एक महिला प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होती. आरपीएफ कॉन्स्टेबल के. सनीताने प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिलं. ट्रेनचा वेग वाढवल्यानंतर महिलेचा तोल गेला अन् ती धडपडली. त्याचवेळी सनीता यांनी धाव घेत महिलेला ट्रेनपासून दूर खेचलं. यामुळे महिलेचा जीव वाचला. असताना मंगळवारी स्टेशनवर ही घटना घडली.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी सनीताचे अभिनंदन केलें. सनिताने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिला प्रवाशाचे प्राण वाचले. सनीताने दाखवलेल्या शौर्य आणि सतर्कतेच्या कृतीमुळे आमच्या रेल्वे संरक्षण दलाचे मनोबल तर वाढतेच पण इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही असे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळते.

हे पण वाचा


टीम झुंजार