बीड :- आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी 32 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये नवरी, नवरदेवाच्या आई-वडिलांसह फोटोग्राफर, आचारी, लग्न लावणारा ब्राह्मण आणि काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. या प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ग्रामसेवक शंकर मुरलीधर म्हेत्रे यांनी आष्टी ठाणे गाठून फिर्याद दिली. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावं भास्कर आश्रुबा पालवे, सिंधुबाई भास्कर पालवे, आश्रुबा पालवे, केसरबाई पालवे, शिवाजी पालवे, संगीता पालवे, चंद्रकांत पालवे, साखरबाई पालवे, भीमराव पालवे, चतुराबाई पालवे, विठ्ठल पालवे, परमेश्वर पालवे, युवराज पालवे, सुभाष पालवे, एकनाथ पालवे, शंकर पालवे, लहू पालवे, अशोक वनवे, रामराव वनवे, विजय गोल्हार (रा. मुर्शदपूर आष्टी), राहुल काकडे, संदीप अर्जुन गर्जे, अर्जुन बाबू गर्जे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाजंत्रीवाल्यांवरही गुन्हा दाखल या प्रकरणात नवरदेवाचा मामा, नवरीचा मामा फोटोग्राफर, वाजंत्रीवाले, मंडपवाले, लग्न लावणारे ब्रह्मण, आचारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






