एरंडोल :- सुरळीत वीज पुरवठा अभावी व अनधिकृत आकडेधारकांना कंटाळून विज जोडणी वापस घेण्याची अनोखी मागणी वीज मंडळाकडे अधिकृत ग्राहकांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे की रिंगणगाव वीज उपकेंद्रा अंतर्गत पिंपळकोठा प्र.चा. शेतशिवारातील गंगाराम बुवा डीपी ही ६३ अश्वशक्तीची असून यावर अधिकृत 12 शेती वीजपंप ग्राहक आहेत. आणि बारा अनधिकृत आकडे धारक आहेत. त्यामुळे डीपी ओवरलोड होऊन पाच पाच मिनिटात फ्युज उडणे डिवो पडणे, असे प्रकार घडत असून खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचे जेरीस आले आहेत.
आता सध्या पूर्व हंगामी कापूस लागवड सुरू असून अवघ्या दोन पानांवर असलेल्या कापूस बियाण्याच्या अंकुरास लगेच पाण्याची नितांत गरज आहे. मात्र वीजच सुरळीत चालत नसल्यामुळे पूर्व हंगामी कापूस लागवड धोक्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी विज उपकेंद्रात सूचित करून देखील कुठलीही कार्यवाही अनधिकृत वीज ग्राहकांवर होत नाही. यामुळे या ट्रांसफार्मर वरील वीज ग्राहकांनी सरळ वीज उपकेंद्र गाठून एका लेखी अर्जाद्वारे “अनधिकृत वीज ग्राहकांवर कारवाई करा, अन्यथा आमची वीज जोडणी वापस घ्या” अशी अनोखी मागणी आज कनिष्ठ अभियंता रिंगणगाव विज उपकेंद्र यांना भेटून केली.
निवेदनावर या शेतकऱ्यांच्या आहेत सह्या
१) रवींद्र अंबादास पाटील
२) इस्माईल गणी पटेल.
३) दगडू गंगाराम पाटील.
४) राजेंद्र दत्तू पाटील.
५) कुर्बान बना पटेल.
६) रसूल गंभीर पटेल.
७) युवराज राजाराम पाटील.
साहेबांचा अनोखा सल्ला, अधिकृतवीज ग्राहक आश्चर्यचकित
जेव्हा हे गाऱ्हाणे घेऊन शेतकरी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र रिंगणगाव यांच्याकडे गेले. तर त्यांनी चार तास अधिकृत वीज ग्राहक, व चार तास अनधिकृत वीज ग्राहक, अशी वीज वापरा. असा अनोखा सल्ला शेतकऱ्यांना दिला असुन यामुळे शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. यामुळे शेतकऱ्यांनी आमचे वीज कनेक्शन वापस घ्या अशी मागणी वीज उपकेंद्राकडे केली आहे.
आकडे टाकणारे शेतकरी वीज मागणी अर्ज भरण्यास तयार, परंतु वीज मंडळाची टाळाटाळ
यावेळी अनधिकृत वीज वापरणारे शेतकरी देखील उपस्थित होते. आम्ही वीज जोडणी घेण्यास तयार असून आम्हाला त्वरित रीतसर विजजोडणी द्या. अशी मागणी आकडेधारकांनी केली. मात्र लोड शिल्लक नसल्यामुळे आम्ही वीज जोडणी देऊ शकत नाहीत. असे वीज मंडळाने स्पष्ट केले. हा गुंता सुटायचा नाही, आणि कापसाच्या इवल्याशा अंकुराचे नुकसानही थांबणार नाही. यासाठी अधिकृत वीज ग्राहकांनी सरळ वीज जोडणी वापस घ्यावी अशी मागणी केली असून आमचे महागडे बियाणे, खते शेतीत ओतले गेले असून पाणी उपलब्ध असून देखील सुरळीत वीज पुरवठा अभावी कापसाचे अंकुर जळत असून प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पाणीपुरवठ्याची नितांत गरज भासत आहे.
पिक वाया गेल्यास यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूदंड बसणार आहे. यास सर्वस्वी वीज मंडळ जबाबदार राहील. असा ही उल्लेख अर्जात करण्यात आला आहे.
आता यावर संबंधित अधिकारी काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
वीज वितरण कंपनीने केली कार्यवाहीस सुरुवात
काल शेतकऱ्यांनी सामूहिक वीज जोडण्या वापस करण्याच्या दिलेल्या निवेदनानुसार आज वीज मंडळात खडबड उडाली असून आज अनधिकृत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणीची धडक कारवाई करण्यात आली . त्यानुसार सुमारे आठ ते दहा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापून वायरी जमा करण्यात आल्या.
हे पण वाचा
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.