सोलापूर :- महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सध्या सोलापूर शहरात समोर आलेला असून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत लॉजवर नेऊन तिला जबरदस्तीने बियर पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. त्यावेळचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडून दोन लाख रुपये घेतलेले असून याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ओंकार बाळासाहेब मोरे ( वय 23 वर्ष राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून मागच्या वर्षी त्याची पीडित मुलीसोबत ओळख झालेली होती त्यानंतर त्याने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये तिला लॉजवर तो घेऊन गेला. लॉजवर घेऊन गेल्यानंतर त्याने तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि तिला बियर पाजली आणि त्यानंतर ती शुद्धीत नसताना तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलीला सुद्धा आली त्यावेळी ती नग्न अवस्थेत बेडवर पडलेली होती. आरोपीने तिचे काही फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत माझ्यावरील कर्ज फेडण्यासाठी मला पैसे दे असे तो म्हणू लागला. पीडित मुलीने अखेर आजीचे एटीएम कार्ड आणि पासवर्ड त्याला दिला त्यानंतर त्याने पैसे तर घेतलेच वर मनमानी पद्धतीने तिच्यावर अत्याचार करायला सुरू केलेले होते अखेर पीडितेने पोलिसात जाऊन आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






