मारवड येथील व्यापारी संकुलातील दुकानाला लागलेल्या आगीत 7 लाखांचे नुकसान. अग्नीशामक गाडी येई पर्यंत सर्व सामान जळुन खाक.

Spread the love

प्रतिनिधी | अमळनेर.

येथून जवळच असलेल्या मारवड येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलातील भाडे तत्वावर असलेले राजेंद्र भगवान पाटील यांचे शिव जनरल अँड किराणा दुकान दिनांक ११ रोजी सकाळी ३ ते ३;३० दरम्यान आग लागली यात जवळपास ७ लाखांचे नुकसान झाले आहे.
ग्रामपंचायत मारवड यानी बांधधलेल्या व्यापारी संकुल कॉप्लेक्स मध्ये शिव जनरल स्टोअर्स अन्ड किराणा नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक राजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता आपल्या दुकानाच्या दिशेने मोठा धूर निघताना दिसला

म्हणुन ग्रामपंचायत व्यापारी संकुलात असलेल्या आपल्या दुकानाकडे आले असता त्यांचा मालकीचे शिव जनरल स्टोअर्स अन्ड किराणा दुकानात जाळ होतांना दिसले दुकानातुन मोठ्याप्रमाणात धुर निघत दिसला म्हणून त्यांनी आरडा ओरड केला असता दुकानाजवळ दिनेश नारायण साळूखे, शरद नामदेव कुंभार, गोकुल केशव पाटील, रविद्र यादवराव पाटील, कैलास जगन्नाथ पाटील, प्रकाश राजाराम चौधरी, अनिल साहेबराव पाटील, असे गावातील इतर लोक जमा झाले.

किराणा दुकानाचे शटर उपडले असता दुकानात मोठ्या प्रमाणे जाळ चालू होता, लोकांनी सदर दुकानातील बादली ने पाणी टाकुन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग हि आटोक्यात येत नाही त्यावेळी दिनेश नारायण साळुखे हे पोलीस स्टेशनला जावुन ठाणे अमलदार यांना सागुन अम्नीशामक दल यांना कळविले असता अमळनेर येथील अग्नीशामक गाडी येई पर्यंत सर्व दुकान जळुन खाक झालेले होते त्यानंतर अग्नीशामक दलाने पाणी मारुन संपूर्ण आग आग आटोकयात आणली तोवर दुकानातिल संपूर्ण वस्तुंची राख रांगोळी झाली होती.

आग हि कशी लागली या बाबत काही एक सांगता येणार नाही परंतु रात्री मधुन दोन ते तिन वेळा दुकानात आग इलेक्ट्रीक लाईन ट्रिप झाल्याने एखादेवेळी दुकानात इलेक्ट्रीक शॉक सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटना स्थळी पीएसआय विनोद पाटील, हवलदार सुनील अगोने, तलाठी श्री भावसार, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार