बदाऊन (उत्तर प्रदेश):- आपल्याकडे आत्याच्या म्हणजेच वडिलांच्या बहिणीच्या मुलाशी लग्न करण्याची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. अनेक ठिकाणी तर आत्याच्या मुलाचं आणि मामाच्या मुलीचं प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या चर्चाही कानावर येतात.उत्तर प्रदेशात तर एका तरुणीने चक्क नवरा वरात घेऊन दारात आल्यावर आपलं आत्याच्या मुलावर प्रेम असल्याचं सांगितलं आणि तिचा नवरा तिच्याच खास मैत्रिणीला बायको बनवून घरी घेऊन गेला. बदाऊन जिल्ह्यात ही अनोखी लग्नघटिका पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्सी भागातील तरुणाचं उझानी भागातील तरुणीशी लग्न ठरलं होतं. या तरुणीचं आपल्या आत्याच्या मुलासोबत घट्ट नातं होतं.
दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे, परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्यांची ही जवळीक पसंत नव्हती. त्याने तिला आधीच त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. मात्र तरुणीने त्याचं अजिबात ऐकलं नाही आणि आत्याच्या मुलासोबतचं नातं तसंच ठेवलं. परंतु दोघांनी आपल्या नात्याला भाऊ-बहिणीपलीकडे काही नाव दिलं नव्हतं.
अखेर लग्नाची तारीख जवळ आली, तयारीही पूर्ण झाली होती. लग्नाच्या दिवशी नवरा थाटामाटात वरात घेऊन नवरीच्या मांडवात दाखल झाला. अंगणात वरात नाचत असतानाच कोणीतरी नवऱ्याला नवरीचे तिच्या आत्येभावासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं आणि
त्याच्या तळपायातली आग मस्तकात गेली. आधीच त्याला दोघांवर संशय होता, त्यात ऐन लग्नाच्या दिवशीच ही बातमी मिळाली.
मग त्याने थेट नवरीला फोन केला आणि ‘मला फसवलंस…आता तुला लग्नानंतर बघून घेईन’, अशी धमकीच दिली. त्यानंतर नवरी चांगलीच खवळली आणि तिने ताबडतोब त्याला लग्नासाठी नकार दिला. आता मला आत्याच्याच मुलासोबत लग्न करायचंय, असं तिने संतापाने सांगितलं. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मोठं घमासान झालं.
तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी नवऱ्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन केला.त्यानंतर नवरा वरात घेऊन माघारी जाणार तोच गावकऱ्यांनी बैठक बोलावली आणि नवरीच्याच मैत्रिणीचं त्याच्याशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. नवरा आणि मैत्रिणीने यासाठी होकार दिल्यानंतर त्याच मांडवात दोघांचं विधिवत लग्न पार पडलं.
तर, आपल्या मुलीचं मन समजून घेऊन नवरीच्या वडिलांनीही तिच्या पसंतीने कासगंज जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. त्यानंतर दोन्ही जोडप्यांची आनंदात पाठवणीही झाली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही कुटुंबियांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……