जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.
वृषभ :-
वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.
मिथुन :-
नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अति घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.
कर्क :-
विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह :-
आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.
कन्या :-
आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.
तूळ :-
महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.
वृश्चिक :-
काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.
धनू :-
फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.
मकर :-
चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
कुंभ :-
हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मीन :-
अति घाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.
हेही वाचलंत का ?
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….