Viral Video: आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरुन तरुणाई नाराज होते तर कधी रागात टोकाचं पाऊल उचलते. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. लोक कधी काय विचार करतात आणि कधी विचित्र धोकादायक पाऊल उचलतात काहीच सांगू शकत नाही.असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाने अचानक रेल्वे ट्रॅकवर असं काही केलं की अंगावर काटाच उभा राहिला.
याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. एक व्यक्ती कमी गर्दी असलेल्या प्लॅटफॉर्मला उभा असल्याचं दिसत आहे. त्याने अचानक केलेल्या कृत्यामुळे तुम्हीही चाट पडाल. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर एकटा उभा असल्याचे दिसत आहे. यानंतर तो आजूबाजूला कोणी आहे का हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहतो.
मग ट्रेन येण्याची वेळ होताच ही व्यक्ती रुळावर उडी मारते आणि रुळावर डोकं ठेवून पडून राहते. सुदैवाने एका लेडी कॉन्स्टेबलची नजर त्याच्यावर पडते. यानंतर कॉन्स्टेबलने जीवाची पर्वा न करता रुळावर उडी मारली आणि ट्रेन खाली येण्यापूर्वीच त्या व्यक्तीला तेथून दूर हटवले. हे पाहून आणखी काही लोक कॉन्स्टेबलच्या मदतीसाठी धावून येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
@RPF_INDIA च्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 57 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. लोक महिलेच्या धाडसाचं आणि तत्परतेचं कौतुक करत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकावर असे प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही लोकांनी असे धोकादायक पाऊल उचललं आहे. मात्र काहींना अशा धोकादायनक कृत्यामुळे आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.
हे पण वाचा
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.